Atol (अतोल)
स्व. रघुवीर व शरयू पाटील ठाणे जिल्ह्यातील शेतकरी समाजाच्या वेलीवर फुललेली ही दोन प्रसन्न, हसरी, उमदी फुले. पू. साने गुरुजी आणि पू. आचार्य भिसे यांच्या जीवनगंगेत न्हालेली, रंजल्या गांजलेल्यांना मदतीचा हात देत, स्वतःबरोबर समाजाचे जीवन सुगंधित व्हावे यासाठी सतत झपाटलेले प्रीतिबद्ध जीवन-शिल्प. दोघांनी परस्परांच्या सहकार्याने शिक्षण, साहित्य, समाजसेवा राष्ट्रसेवा अशा विविध आघाड्या सांभाळल्या. उत्तम वक्ता, साहित्यिक, टिकाकार, समाजसेवक आणि माणूसकी असलेला माणूस. ऐन तारुण्यात एकोणीसशे एकूणसत्तर साली रघुवीरची जीवनयात्रा स्थगित झाली. अवघ्या चार महिन्यात सप्तपदी आठवीत दोन छोट्या अंकुरांना मागे टाकून शरयूही निघून गेली. एक सेवाभावी, त्यागी व गोड घरटे उध्वस्त झाले. बलवान नियतीलाही या ध्येयवादी दांपत्याचे सतत स्मरण व्हावे आणि संबंधितांना वाटणाऱ्या हळहळीचे कायमचे प्रतिक व्हावे म्हणून ही 'रघुवीर - शरयू स्मारक साहित्यस्पर्धा'. पुरोगामी, समाजसुधारणेला वाहिलेल्या 'चालना' मासिकातर्फे प्रतिवर्षी ही साहित्यस्पर्धा आयोजित केली त्याच स्पर्धेतील हो पारितोषिक विजेती कादंबरी.