रेशमचं आजकाल बदलापूरला जाणं वाढलं होतं. सुमाला थोडी तिच्या अभ्यासाची काळजी लागून राही, पण ती उघडपणे कसला विरोध नोंदवीत नसे. पण आज रेशमनं क्लास बुडावायची भाषा केली तेव्हा मात्र सुमा म्हणाली,
"क्लास करून गेली असतीस रेशम, तर मला बरं वाटलं असतं."
"आई, आज वैद्य सर येणार नाहीत. त्यांच्याऐवजी बदले सर तास घेणारेत. आणि त्यांची तेवढी मास्टरी नाही गं गणितावर. नुसते फिल इन द ब्लँक्स तास कशाला अटेंड करू मी? त्यापेक्षा मी आजोबांकडे जाईन. गेल्या वेळेस ते मला काय म्हणाले ठाऊक आहे?"