तिच्या तीन मुली म्हणजे तिच्या सोनपाकळ्या. पण मोठी मुलगी मुकबधिर होती. आपल्या मुक्या मुलीला आयुष्यात यशस्वी करण्यासाठी तिनं जो अपूर्व लढा दिला तो डोळे दिपवणारा होता. प्रत्येक आईनं वाचावी अशी दीर्घकथा, मुक्या मुलांच्या पालकांना विशेष आवडावी अशी गोष्ट. ईश्वरी ही ‘त्रिदल’मधली दुसरी दीर्घिका.
होय !ती काळी होती. काळ्या मुलींची अवहेलना कशासाठी? घरीदारी रंग तिचा वैरी ठरला. पण ती जिद्दीनं उभी ठाकली. हुंडाबळी झाली नाही. कारण स्वत:च्या कर्तृत्वावर तिचा ठाम विश्वास होता. प्रत्येक तरुणीनं ‘ईश्वरी’पासून स्फूर्ती घ्यावी अशी दीर्घकथा..