Manbachi Ubhari (मनाची उभारी)
प्रिय मुलांनो, आत्मविश्वास फक्त सात पावलांवर तुमची वाट बघतो आहे. की सात पावलं तुम्ही जर का माझ्यासोबत चाललात तर मग काय? तुम्हाला 'भीती' या शब्दाचीच मुळी भीती नको. मोठी माणसे लग्न करताना सप्तपदी चालतात आणि जन्मभर एकमेकांना प्रेम, जिव्हाळा, साथ, विश्वास, चांगली वागणूक, माणुसकी आणि सुख-दुःखात एकत्र राहीन, असे वचन देतात. मग त्यांना सोबत करून सात पावले चालणार आहोत? सांगू? सांगते लाडक्यांनो! प्रार्थना, सत्य, शिव, सुंदर यांची सोबत, सतत प्रयत्न, खिलाडू नम्रवृत्ती, संयम या सात मित्रांना जो कोणी सोबत घेतो तो विजयीच होतो, हे कायम लक्षात ठेवा. हे शब्द जड वाटतात का? पण मी आहे ना ते सोप्पे करून तुम्हाला सांगायला. तुम्ही फक्त या मित्रांची सोबत बरोबर ठेवलीत की, 'आत्मविश्वास' या मोठ्या मित्राला आपलेसे केलेतच म्हणून समजा ! चलो फिर...