तुम्हालाही वाटतं का? - माझ्याकडे पैसे टिकत नाही? पैसा खूप कष्ट केलाच की येतो? माझ्यापेक्षा कमी मेहनत करणाऱ्याचा पगार वाढ होतोय? मी जास्त अभ्यास केला तरीही मार्क्स कमी येत आहेत? पैसा खूप मेहनतीने कष्टाने येतो माझ्याकडे? कधी कधी तर येतच नाही आणि आला की लगेच संपतो.
असं काही किंवा तुम्ही तुमच्या सध्याच्या रिलेशनशिपमध्ये खुश नाही आहात किंवा कशाचा ना कशाचा तुम्हाला त्रास होतोय?
किंवा सगळं छान चाललंय आयुष्यात सगळ आहे तरी एक समाधान नाहीये, तुमच्या अशा छोट्या-मोठ्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हे पुस्तक वाचलं की मिळेल. तुम्ही शाळा किंवा कॉलेजमधील विद्यार्थी असाल किंवा नोकरी धंदा करणा करणारे असाल, किंवा तुम्ही गृहीणी असाल तर तुमच्या रोजच्या छोट्या मोठ्या समस्या आणि पैसा तुमच्याकडे सतत भरपूर प्रमाणात कसा येईल या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढील धड्यांमध्ये मिळतील.
बऱ्याचदा काय होतं, आकर्षणाचा सिद्धांत (law of attraction) आपल्याला माहितही असतो, पण खूप जणांचा असा समज होतो की फक्त सकारात्मकच बोलायचं ना, एवढंच ना?
खरं सांगायचं तर, मलाही आधी असंच वाटायचं.मग मी काही युट्युब वर व्हिडिओज पाहिले पुस्तकं वाचलीत, तेव्हा मला ही नीट समजलं आणि मी ते रोजच्या जीवनात वापरू लागले. मग मी माझे जीवन सहज सोप्प आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जीवन आनंदी केले. आणि तुम्हीही माझ्यासारखं असच सहज सोप्प आणि आनंदी आयुष्य deserve करता आणि ते कसं शक्य होऊ शकतं हे ही तुम्हाला पुढील धड्यांमध्ये समजेल.