द स्पाय क्रॉनिकल्स. रॉ आयएसआय आणि शांततेचा आभास. अमरजितसिंह दुलत हे ‘रॉ’चे माजी प्रमुख आहेत, तर असद दुर्रानी ‘आयएसआय’चे माजी प्रमुख आहेत. 2016मध्ये दुलत आणि दुर्रानी यांच्यादरम्यान अनेकदा संवाद झाला. त्या दोघांमध्ये पत्रकार आदित्य सिन्हा यांच्या मध्यस्थीनं इस्तंबूल, बँकॉक आणि काठमांडू यांसारख्या शहरांमध्ये भारत-पाकिस्तान संबंधांचा ऊहापोह करणाऱ्या अनौपचारिक चर्चा झाल्या. या संवादामध्ये काश्मीर आणि शांततेची गमावलेली संधी; हाफीज सईद आणि 26/11, कुलभूषण जाधव; सर्जिकल स्ट्राइक; ओसामा बिन लादेनचा सौदा अशा अनेक संवेदनशील मुद्द्यांवर गंभीर तरीही मनमोकळी चर्चा करण्यात आली आहे. या पुस्तकामध्ये हेरगिरीच्या क्षेत्रातील या दोन्हीही दिग्गजांनी भारतीय उपखंडातल्या राजकारणाचा खोलवर वेध घेतलेला आहे.